Drumstick Benefits : शेवग्याची शेंग खाता का? जाणून घ्या फायदे

शेवग्याच्या शेंगाना मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टीक (drumstick) असेही म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगाचे आहारात सेवन केले तर शरीराला मोठा फायदा मिळतो. काय आहेत याचे फायदे जाणून घेऊयात.

Drumstick Benefits

1/10
आजकाल बहुतांश घरात शेवगाच्या शेंगांचा वापर केला जातो. कधी याची आमटी बनवली जाते, तर सांबर बनवताना याचा वापर केला जातो.
2/10
शेवग्याच्या शेंगाचे आहारात सेवन केले तर शरीराला मोठा फायदा मिळतो. काय आहेत याचे फायदे? जाणून घेऊयात
3/10
गरोदर महिलांकरता शेवगाच्या शेंगाचे मोठे महत्व आहे. यात कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे गरोदर महिलेच्या शरीरात दुधाची पातळी नियंत्रीत राहते. शेवग्याच्या शेंगांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, के, बी आणि खनिजे- लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक असतात आणि त्या फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे हे सर्व गर्भवती महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
4/10
अनेकदा अपचन झाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होतात. मात्र शेवगाच्या शेंगाचा वापर आहारात केल्यास पोटाच्या सर्व समस्या दूर होऊ शकतो. पोटदुखी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत होते.
5/10
आजकाल लोक मोबाईल फोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा जास्त वेळ देत असतात. याचे सेवन केल्यास तुमचे डोळे निरोगी राहू शकतात.
6/10
अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, शेवगाच्या शेंगा पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत
7/10
डायबेटिस रूग्णांकरता शेवगाच्या शेंगा फायदेशीर आहेत. यामुळे रक्तातील शुगर लेवल नियंत्रणात राहते.
8/10
शेवगाच्या शेंगा खाल्ल्याने इम्यूनिटी मोठ्या प्रमाणात वाढते. यात Vitamin C असल्याकारणाने व्हायरल इंन्फेक्शन सारखे आजार दूर होतात.
9/10
शेवग्याच्या शेंगात आवश्यक खनिजे कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचा स्त्रोत असल्याने वाढत्या मुलांची हाडे मजबूत होतात. आहारात नियमित समावेश केल्याने वृद्ध लोकांमध्ये सुद्धा हाडांची घनता पूर्वीसारखी होते आणि ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे कमी होतात. ह्या शेंगा खाणे लहान मुलांच्या हाडांच्या फ्रॅक्चरला बरं करण्यात फायदेशीर ठरतात.
10/10
यात असलेल्या कोलेजेन प्रोटीन त्वचेच्या मोठ्या छिद्रांवर देखील परिणाम करते आणि त्वचा मऊ करते. शेवग्याची पाने किंवा शेंगाची पावडर रक्ताला शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी करते.
Sponsored Links by Taboola