Kerala Tour : केरळमधील निसर्ग सौंदर्य लुटण्याचा आनंद घ्या, IRCTC च्या खास टूर पॅकेजमध्ये स्वस्तात फिरण्याची संधी
IRCTC Kerala Tour Package : केरळला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. तुम्ही नवीन वर्षात केरळ फिरण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी नक्की वाचा. (PC : istock)

Kerala Amazing Kerala Ex Pune
1/11
भारताच्या दक्षिणेला असलेलं केरळ हे निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. (PC : istock)
2/11
आयआरसीटीसीकडून टूर पॅकेजस लाँच केले जातात. IRCTC नं खास केरळ टूर पॅकेज आणलं आहे. नवीन वर्षात तुम्हीही फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. (PC : istock)
3/11
जर तुम्ही फेब्रुवारीमध्ये नवीन वर्षात केरळला फिरण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी खास टूर पॅकेज आणलं आहे. (PC : istock)
4/11
केरळ फिरण्यासाठी IRCTC च्या या परवडणाऱ्या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला मुन्नार ते कोची, थेक्कडी, कुमारकोम येथे जाण्याची संधी मिळत आहे. हे पॅकेज पुण्यापासून सुरू होणार आहे. (PC : istock)
5/11
Amazing Kerala Ex Pune असं या पॅकेजचं नाव आहे. हे एक कम्फर्ट पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला पुणे ते कोचीपर्यंत फ्लाइटची सुविधा मिळत आहे. (PC : istock)
6/11
या पॅकेजमध्ये तुम्हाला पॅकेजनुसार थ्री-स्टार हॉटेलमध्ये हॉटेल रूम शेअर किंवा नॉन शेअर करण्याची सुविधा मिळत आहे. (PC : istock)
7/11
पॅकेजमध्ये प्रवाशांना अलेप्पी किंवा कुमारकोममध्ये क्रूझची सुविधा मिळत आहे. (PC : istock)
8/11
आयआरसीटीसी हे 5 दिवसांचं पॅकेज असून या पॅकेजमध्ये तुम्हाला 5 वेळ नाश्ता आणि 5 वेळ जेवणाची सुविधा मिळत आहे. (PC : istock)
9/11
प्रत्येकाला पॅकेजमध्ये प्रवास विम्याचा लाभही मिळत आहे. हा विमा फक्त 60 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी उपलब्ध आहे. (PC : istock)
10/11
केरळच्या या पॅकेजसाठी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसाठी मोजावे लागतील. (PC : istock)
11/11
तुम्हीही केरळ फिरण्याचा विचार करत असाल तर IRCTC चं हे पॅकेज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. (PC : istock)
Published at : 01 Jan 2024 07:46 AM (IST)