Mental Health : मन आनंदी ठेवण्याकरता 'या' सोप्या पद्धतींचा करा अवलंब
आजच्या फास्ट फॉरवर्ड जीवनात आपले मन सतत विचलित होत असते. वाढत्या कामाचा ताण किंवा वाढत्या धावपळीमुळे स्वत:ला ताजेतवाणे ठेवणे खूप गरजेचे असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला मानसिक थकवा जाणवतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मात्र येणाऱ्या या मानसिक थकव्याची गरज करण्याची फार आवश्यकता नाही. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या पद्धतीचा अवलंब रोजच्या आयुष्यात करायचा आहे.
ध्यानधारणा - ध्यान मनाला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खरोखर मदत करते. ध्यान केल्याने मानसिक शांती मिळते ज्यामुळे तणाव कमी होतो. ध्यान केल्याने लक्ष केंद्रित होते आणि जागरूकता सुधारते. यामुळे मेंदुची ग्रास्पिंग पाॅवर देखील वाढते.
योग्य आहार आणि पाणी - पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. पाणी पिण्याने मेंदूतील रक्त प्रवाह सुधारतो जो मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे. फळे, भाज्या यांसारखे आरोग्यदायी पदार्थ मेंदूला पोषक तत्त्वे देतात.
शारीरिक व्यायाम - व्यायामामुळे मेंदूतील रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. एंडोर्फिनसारखे हार्मोन्स वाढतात ज्यामुळे मूड सुधारतो. नवीन न्यूरॉन्सच्या निर्मितीमुळे मेंदूची क्षमता वाढते. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात त्यामुळे मन शांत राहते.
कामातून ब्रेक घेणे - काही दिवस डिजिटल उपकरणांपासून ब्रेक घेतल्यास मन निरोगी आणि आनंदी राहते. वेळोवेळी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरमधून ब्रेक घेणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपला मेंदू अधिक काम करू शकेल. फोन आणि लॅपटॉपमधून ब्रेक घेतल्याने डोळ्यांना विश्रांती मिळते.
छंद - चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादी छंद मेंदूचे वेगवेगळे भाग सक्रिय करतात. हे मेंदूला आव्हानात्मक काम करण्याची संधी देतात ज्यामुळे नवीन न्यूरॉन्स तयार होतात.
आवडणाऱ्या गोष्टी करा - ताण - तणाव कमी करण्याकरता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. बाहेर फिरायला जा. चांगल्या लोकांमध्ये मिक्स व्हा. त्यांच्याशी मैत्री करा.
सोलो ट्रॅव्हलिंग - सोलो ट्रॅव्हलिंग करायला शिका. याने एकट्याने फिरायला शिकाल. अनेक वेगवेगळ्या गोष्टींची माहिती होईल. विविध लोकांना भेटाल.