How To Calm Down An Angry Child : मुलाला खूप राग येतो का? ताबडतोब मुलाला शांत होण्यासाठी 'हे' उपाय करा
मुले प्रौढांपेक्षा अधिक भावनिक असतात. त्यामुळे त्यांच्या भावना सहज दिसून येतात. छोट्या गोष्टींवर ते आनंदी होतात, छोट्या गोष्टींवर रागावतात. मुलांना त्यांच्या भावना कशा व्यक्त करायच्या हेच कळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक पालक सहसा तक्रार करतात की, त्यांचे मुलं सारखीच चिडचिड करतात. मुले चिडचिड करत इतर लोकांशी नीट बोलतही नाहीत. इतकंच नाही तर एखाद्या गोष्टीला नकार देताना त्याची पहिली प्रतिक्रिया म्हणजे मोठ्याने ओरडणे राग राग करणे.
अशा परिस्थितीत, मुलांना शांत करण्यासाठी, पालकांनी त्यांना त्यांच्या भावना समजून घेण्यास आणि रागाचा सामना करण्यास मदत करणे. तुमच्या मुलाचा राग शांत करण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतींचा अवलंब करू शकता ते जाणून घेऊयात.
जर तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीचा राग आला असेल, तर तुम्ही त्याच्या भावनांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका. अशा वेळी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा मुले त्यांच्या भावना योग्यरित्या व्यक्त करू शकत नाहीत तेव्हा ते सहसा रागावतात. अशा परिस्थितीत त्याला आपले विचार मांडायला शिकवा. यासाठी तुम्ही घरातील वातावरण असे ठेवावे की ते न घाबरता आपले मत मांडू शकेल.
जेव्हा मुलं राग राग करतात. तेव्हा ते गोष्टी फेकतात. अशा वेळी काहीतरी करायला शिकवा ज्यामुळे त्यांना बरे वाटेल. यासाठी ते रंगकाम करू शकतात, पुस्तक वाचू शकतात किंवा त्यांच्या आवडत्या खेळण्यांसह खेळू शकतात. असे केल्याने त्यांचे मन विचलित होईल.
तुमच्या मुलाला राग नियंत्रित करायला शिकवा. तुम्ही त्यांना राग येण्याचे तोटे समजावून सांगू शकता आणि काही टिप्स देऊ शकता ज्याच्या मदतीने ते त्यांचा राग कमी करू शकतात. त्यांना दिर्घ श्वास घ्यायला लावा, थंड पाणी प्या, 10 पर्यंत मोजा इ.
जर मुलाला खूप राग येत असेल तर त्याला काहीतरी गोड खाऊ द्या. तुम्ही त्याला त्याची आवडती कँडी किंवा टॉफी देऊ शकता.
रागाच्या भरात चूक झाल्यावर मुलांना सॉरी म्हणायला शिकवा. इतकंच नाही तर त्यांना सांगा की त्यांचे कधी कोणाशी भांडण झाले तर नंतर नक्कीच सॉरी म्हणावे. असे केल्याने मुलाला त्याची इतरांप्रती असलेली जबाबदारी समजते.
जर मुल एखाद्या गोष्टीवर नाराज आणि रागावले असेल तर तुम्ही त्याला मदतीसाठी विचारले पाहिजे. अशा प्रकारे मुल तुम्हाला त्याच्या जवळचे समजेल. तो स्वतःला तणाव आणि आक्रमकतेपासून मुक्त करू शकेल. तुम्ही त्याला नेहमी मदत कराल असे त्याला वाटू द्या.
शांत होईपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना एकटे सोडू शकत नाही. अशाप्रकारे तो शक्य लवकर स्वत: ला शांत करण्यास आणि आपले विचार व्यक्त करण्यास सक्षम असेल.