Turtle information : जगातील सगळ्यात म्हातारे कासव कोणते? घ्या जाणून सविस्तर
कासवांच्या दीर्घ आयुष्यामागील रहस्य जाणून घ्या. याशिवाय कासवांच्या जैविक प्रक्रियेचीही माहिती जाणून घ्या ज्यामुळे ते इतके दीर्घ आयुष्य जगतात.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकासवांच्या इतर अनेक प्रजातीदेखील जगभरात आढळतात, जे १०० वर्षांहून अधिक काळ जिवंत राहिलेले बघण्यात आले आहे.(Photo Credit : Pixabay)
कासवांच्या शरीरावर कठोर कवच असते. हे कवच कासवांच्या अवयवांचे बाह्य हल्ल्यांपासून संरक्षण करते. अनेकदा हल्ला झाल्यास, कासव त्यांच्या कवचाच्या आत लपून बसतात. (Photo Credit : Pixabay)
कासवांची लहानपणापासूनच काळजी घेतली तर ते दीर्घायुष्य जगू शकतात. अनेक कासवे १५० वर्षांपेक्षा जास्त जगतात. आता कासव इतकी वर्ष जगतात कसे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.(Photo Credit : Pixabay)
शास्त्रज्ञांच्या मते, कासवांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य त्यांच्या डीएनए रचनेत दडलेले आहे. (Photo Credit : Pixabay)
कासवांचे जनुक प्रकार दीर्घकाळापर्यंत त्यांच्या शरीराच्या सेलमधील डीएनए दुरुस्त करत असतात, यामुळे सेलच्या दीर्घायुष्यात मोठी वाढ होते. (Photo Credit : Pixabay)
काही कासवे २५० वर्षांपेक्षा जास्त जगण्याचे हे एक मोठे कारण आहे. २५६ वर्षे जगलेल्या अल्दाब्रा कासवांवर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, चांगल्या जनुकांच्या प्रकारांमुळेच ते इतके दिवस जगू शकले.(Photo Credit : Pixabay)
आत्तापर्यंत सर्वात जास्त काळ जगलेल्या दुसऱ्या कासवाचे नाव अल्दाब्रा कासव आहे.ते सुमारे २५६ वर्षे जिवंत राहिले. अल्दाब्रा कासव आकाराने खूप मोठे होते.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)