Honey Side Effects : मधाचा अतिवापर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो, जाणून घ्या
मध आरोग्यासाठी कोणत्याही अमृतापेक्षा कमी नाही. अँटिऑक्सिडंटने समृद्ध मध आपल्या शरीराला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु गरजेपेक्षा जास्त वापरल्यास ते विषही बनू शकते.त्यामुळे आरोग्याचे अनेक नुकसान होऊ शकते.काय आहेत तोटे जाणून घेऊया.
जर तुम्ही जास्त प्रमाणात मधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता देखील वाढू शकते. कारण त्यात असलेले साखर आणि कार्ब्सचे प्रमाण शरीरातील कॅलरीज वाढवते आणि हे वजन वाढण्याचे कारण बनते.
मध हा उष्ण प्रभावाचा असतो. जर तुम्ही साखरेऐवजी प्रत्येक गोष्टीत मध वापरत असाल तर ते तुमच्या पचनाला हानी पोहोचवू शकते. तुमचे पचन मंद होऊ शकते.
जर तुम्ही नियमितपणे मधाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात मधाचे सेवन केल्याने तुमच्या तोंडाच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. मध दातांना चिकटून राहते आणि त्यामुळे दातदुखी, हिरड्या सुजणे, पोकळी येण्याची समस्या वाढू शकते. जेव्हा तुम्ही मध खाता तेव्हा दात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.
अॅलर्जीचा त्रासही होऊ शकतो. तुम्हाला उलट्या, जुलाब होऊ शकतो.
उन्हाळ्यात मधाचे सेवन टाळावे. जेव्हा तापमान खूप जास्त असेल तेव्हा मध खाणे योग्य नाही.
वसंत ऋतूमध्ये मधाचे सेवन केल्यास उत्तम.
मध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु तज्ज्ञांच्या मते, जर ते जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर ते शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढवू शकते.