Home tips : चादर टॉवेल किती दिवसांनी धुवावेत.

निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.photo credit : Unsplash
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काही लोक दर आठवड्याला त्यांची चादर आणि टॉवेल धुतात, तर काही लोक महिन्यानंतर धुतात. photo credit : Unsplash

चादरी आणि टॉवेल धुण्याबद्दल लोकांची स्वतःची अशी मतं आहेत. पण, चादर आणि टॉवेल नेमके किती दिवसांनी धुवावेत याचं अचूक उत्तर मात्र कोणालाच माहीत नाही. photo credit : Unsplash
जेव्हा आपण अंघोळीनंतर टॉवेल वापरतो तेव्हा शरीरात असलेले सूक्ष्म जंतू त्यात प्रवेश करतात. हे सूक्ष्म जंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. photo credit : Unsplash
काही लोकांन अंघोळीनंतर टॉवेल तसाच ओला बेडवर किंवा कुठेही ठेवण्याची सवय असते. photo credit : Unsplash
ओला टॉवेल ठेवल्यामुळे त्या ठिकाणी जंतूंची पैदास होते. त्याचप्रमाणे ज्या पलंगावर तुम्ही रोज झोपता त्यावर मोठ्या प्रमाणात मृत पेशी, घाम, तेल आणि जंतू जमा होतात. photo credit : Unsplash
टॉवेलचे फॅब्रिक बेडशीटपेक्षा जाड असते, त्यामुळे ते जास्त काळ ओले राहतात.photo credit : Unsplash
बेडशीट किंवा चादर कधी धुवायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते आपण कसं आणि किती वापरतो यावर अवलंबून आहे.photo credit : Unsplash
तुम्ही स्वच्छता राखत असाल तर तुम्ही बेडशीट आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा धुवा. photo credit : Unsplash
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.