Kolhapur Airport : मराठ्यांचा इतिहास अन् ऐतिहासिक वारशाचं प्रतिबिंब असलेल्या कोल्हापूर विमानतळाचं लवकरच लोकार्पण
प्रदीर्घ प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर विमानतळाचे काम पूर्णत्वास जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जोतिरादित्य शिंदे यांनी दिली.
विमानतळ पाहणी व विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने त्यांनी कोल्हापूर दौरा केला.
यावेळी त्यांनी नवीन विमानतळ इमारतीच्या कामांची आतून व बाहेरून पाहणी केली व आवश्यक सूचना विमानतळ प्रशासनाला दिल्या.
शिंदे यांनी इमारतीची पाहणी करताना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात सर्व भिंतींवर लावण्याचे निर्देश दिले.
तसेच आलेल्या नवीन प्रवाशांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन लावण्याच्या सूचना केल्या.
स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र व इतर कलाकृतींची त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी त्यांनी आरक्षण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, प्रवाशांसाठी असणारा आराम कक्ष, आरक्षित असणारा व्हिआयपी कक्ष तसेच इतर सुविधांची पाहणी केली.
कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विमानतळावर आल्यावर पाहायला मिळेल असे ते म्हणाले.
मुंबई, बंगलोर व हैद्राबाद या प्रमुख तीन शहरांना अखंड स्वरूपात कोल्हापूर जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.