Teeth Whitening Tips : दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय
संत्र्याची साल आणि तुळशीची पानं वाळवून त्याची पूड तयार करावी. रोज दात घासल्यानंतर या पावडरने दातांना मसाज करावा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेळ्याच्या सालीचा उपयोगही दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी होतो. केळ्याच्या सालीचा आतील पांढरा भाग दातांवर घासावा.
चमचाभर बेकिंग सोड्यात चिमूटभर मीठ आणि थोडं पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट दोन ते तीन मिनिटं दातांवर चोळा.
तुळशीची पानं उन्हात वाळवून घ्यावीत, त्याची पूड तयार करावी. ी पूड टूथपेस्टमध्ये मिसळून दात घासावेत.
टोमॅटोच्या रसाने नियमित दातांना मसाज करावा, यामुळे दातांवरचा पिवळेपणा दूर होतो.
अर्धा चमचा मीठ घ्या आणि त्यात राईच्या तेलाचे काही थेंब व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाने दात घासा. याच्या नियमित वापरणे दातांचा पिवळेपणा दूर होईल.
अंड्याच्या कवचाच्या या पावडरने दात व्यवस्थित घासा. यामुळे दात पांढरेशुभ्र होतील.
एक चमचा बेकिंग सोड्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टने दात स्वच्छ घासा. साध्या पाण्याने गुळण्या करा. याने दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.
संत्र्याची साल व्यवस्थित सुकवा आणि त्याची बारीक पावडर तयार करून ही पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. या पावडरने नियमित दात घासल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.