Home Remedies For Lips: ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय; लवकरच दिसेल फरक
ओठ काळे पडण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे धुम्रपान करणे. इतर बऱ्याच कारणांनी देखील ओठ काळे पडू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओठ काळे पडल्यानंतर बरेच लोक ब्युटी ट्रीटमेंट घेतात. मुली काळे ओठ लपवण्यासाठी लिपस्टिकची मदत घेतात. मात्र ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय देखील करु शकता.
काकडी ओठांचा काळेपणा कमी करते. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि सिलिका समृद्ध संयुगे ओठ उजळ करतात.
यासाठी सर्वप्रथम काकडी बारीक करून घ्यावी. नंतर त्याची पेस्ट बनवा, तुम्हाला हवे असल्यास त्यात गुलाबजल टाकू शकता. आता ते ओठांवर लावा. सुमारे 15 ते 20 मिनिटं ओठांवर राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ करा. दिवसातून 2 वेळा हे करून पाहा.
बीटाने देखील तुम्ही ओठांचा काळेपणा दूर करू शकता. जर तुम्हाला गुलाबी ओठ हवे असतील तर बीट हा उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा गुलाबी ठेवण्यास मदत करते, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर ओठांसाठी करू शकता.
यासाठी प्रथम बीट सोलून घ्या. नंतर खवणीच्या मदतीने ते किसून घ्या. आता ओठांवर किसलेले बीटरूट लावा, 15 ते 20 मिनिटं राहू द्या. यानंतर ते पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून 2-3 वेळा ही पद्धत वापरून पाहा.
एलोवेरा जेलने ओठांचा काळेपणा दूर होतो. जर तुम्हाला ओठांचा काळेपणा लवकर दूर करायचा असेल तर यासाठी तुम्ही दररोज एलोवेरा जेलचा वापर करा.
यासाठी प्रथम एका भांड्यात कोरफडीचा गर घ्या. तो ओठांवर लावून चांगला मसाज करा, सुमारे 10 ते 15 मिनिटं जेल ओठांवर राहू द्या. नंतर कापसाच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा पूर्णपणे कमी होईल.
रात्री झोपायच्या वेळी रोज बदामाचे तेल ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात. मात्र हे तुम्हाला नियमित 15 दिवस करणं गरजेचं आहे.
बर्फाचा वापर नियमित केला तर ओठांचा काळेपणा दूर होतो. यासाठी तुम्हाला बर्फाने ओठांवर मसाज करावा लागेल. ज्यामुळे ओठांवरील मृत पेशी निघून जातील आणि ओठ गुलाबी होतात.
गुलाबी ओठ हवे असतील तर मध आणि लिंबू हा एक उत्तम घरगुती पर्याय ठरु शकतो. एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध मिक्स करुन ते ओठांना लावावं. एक तासानंतर लावलेलं मिश्रण साफ करावं. दिवसातून दोन वेळा हे मिश्रण लावलं तर तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.