Photos: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव, भावनिक करणारे काही क्षण
या सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव पत्कारावा लागला. यावेळी भारतीय संघाची पूर्ण बॅटींग लाईन ढेपाळली. रन मशिन कोहली सामन्यातील पहिल्या डावात 14 धावा आणि दुसऱ्या डावात 49 धावा काढून बाद झाला. या पराभवामुळे अनेक भारतीय चाहते निराश झाले आहेत. या सामन्यातील असे काही प्रसंग आहेत जे तुम्हाला खूपच इमोशन करणारे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोहलीचे चाहते त्याच्यासाठी नेहमीचं इमोशनल असल्याचं दिसून येतं. कोहली बाद झाल्यानंतर ट्विटरवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पराभवानंतर कोहली वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीच्या जवळून जात होता तेव्हा त्यांचा चेहरा खूपच उदास असल्याचं दिसून येत होतं. हा फाटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे.
भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी अजिंक्य राहणेचं बाद होणं हे कोहलीपेक्षा कमी नव्हतं. अजिंक्यने पहिल्या डावाता 89 धावा केल्या होत्या. पण त्याने दुसऱ्या डावात फक्त 46 धावा करून बाद झाला. अजिंक्य राहणे आणि शार्दूल ठाकूरच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 296 धावा केल्या होत्या.
हिटमॅन रोहित शर्माचं बाद होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. रोहितने पहिल्या डावात फक्त 15 धावा केल्या होत्या. पण त्याने दुसऱ्या सामन्यात भारताला चांगली सुरूवात करून दिली. रोहितने 43 धावा केल्या आणि पॅव्हेलियनचा रस्ता धरला.
दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभा केला होता. तर दुसऱ्या डावात 270 धावा केल्या होत्या. यानंतर उत्तरादाखल भारतीय संघाला पहिल्या डावात 296 धावा आणि दुसऱ्या डावात 234 धावाच करता आल्या. यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव पत्कारावा लागला.
दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 469 धावांचा डोंगर उभा केला होता,तर दुसऱ्या डावात 270 धावा केल्या होत्या. यानंतर उत्तरादाखल भारतीय संघाला पहिल्या डावात 296 धावा आणि दुसऱ्या डावात 234 धावाच करता आल्या.
यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव पत्कारावा लागला.