Yoga in Pregnancy : गरोदरपणात योग करायचा असेल तर घाबरू नका, 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या
जर तुम्ही देखील गरोदरपणात योगासने सुरू करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. गरोदरपणात महिलांनी निरोगी राहणे महत्त्वाचे असते. कारण या काळात शरीरात अनेक बदल होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे गर्भधारणेदरम्यान शरीर तंदुरूस्त आणि मन शांत ठेवण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय आहे. गरोदरपणात योग करताना महिलांनी कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.
ही आसने करणे टाळा : गर्भवती महिलांनी पोटावर ताण जाणवत असल्यास कोणतीही आसने करू नयेत. जसे की चक्रासन, नौकासन, भुजंगासन, हलासन, अर्धमत्स्येंद्रासन आणि धनुरासन इ. तुम्ही तज्ञांचे मत देखील घेऊ शकता.
पहिला त्रैमासिक : गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत, गर्भवती महिला उभ्या राहून योग करू शकतात. असे केल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिसरण नीट राहते. त्यामुळे पायांना सूज येत नाही.
पहिल्या त्रैमासिकानंतर: पहिल्या त्रैमासिकात स्त्रियांनी थकवणारी आसने किंवा वेगवान आसने करू नयेत. त्याऐवजी तुम्ही प्राणायाम करू शकता.
चौथ्या आणि पाचव्या महिन्यात : या महिन्यांत योगासने करू नयेत याची विशेष काळजी घ्या. कारण हा गर्भावस्थेचा सर्वात नाजूक काळ असतो. असे जरी केले तरी डॉक्टरांचा किंवा तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.
गरोदरपणाची सुरुवात : गरोदरपणाच्या सुरुवातीस, खांदे आणि पाठीचा वरचा भाग मजबूत करणारा योग करावा. याशिवाय तुम्हाला आरामदायी वाटेल अशी आसने करा. या दरम्यान तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार योगासने करा.
जर तुम्ही गर्भधारणेदरम्यान पहिल्यांदा योगासने सुरू करत असाल, तर तुम्ही 14 व्या आठवड्याच्या आसपास सुरू करू शकता. त्याच वेळी, पहिल्या तिमाहीत योगा करणे टाळा कारण यावेळी गर्भपात होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.