Health Tips : थंडीच्या दिवसात किती वेळ चालायला हवे ; थंडीत चालणे आरोग्यासाठी फायद्याचे
चालणे आरोग्यासाठी खूप चांगलेमानले जाते, पण हिवाळ्यात चालणे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हिवाळ्यात थंड वार्यामुळे व्यायाम किंवा योगा करण्यात थोडा त्रास होतो. पण, जर तुम्ही हिवाळ्यातील कपडे घालून व्यवस्थित चालत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : Pixabay)
तुम्हीही हिवाळ्यात फिरण्याचा विचार करत असाल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा. हिवाळ्यात सकाळी लवकर उठता येत नाही. (Photo Credit : Pixabay)
सूर्य डोक्यावर आला तरी तासनतास अंतरूणत पडून राहावेसे वाटते. व्यायाम किंवा जिमला जावेसे अजिबात वाटत नाही.(Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यात वजन खूप वेगाने वाढते. अशा वेळी प्रश्न पडतो की, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे? पहिली गोष्ट म्हणजे हिवाळ्यातील योग्य कपडे घालणे आणि लांब फिरायला जाणे.(Photo Credit : Pixabay)
कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या पोटातील चयापचय आणि मेंदूच्या आरोग्यावर होतो. तसेच त्याचा संपूर्ण परिणाम रक्ताभिसरणावर होतो. हिवाळ्यात तुम्ही नक्कीच फेरफटका मारला हवा. (Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यात चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण ते तुमचे हृदय निरोगी ठेवते. एवढेच नाही तर हिवाळ्यात चालण्याने तुमचे रक्ताभिसरण सुधारते. त्याच वेळी, ते शरीराला उबदार ठेवण्याचे काम करत असते. (Photo Credit : Pixabay)
शरीराच्या स्नायूंनाही भरपूर विश्रांती मिळते. यामुळे रक्तदाबही चांगला राहतो. यासोबतच चालण्याने मधुमेह संतुलित होण्यास मदत होते. हिवाळ्यात चालण्यानेही त्वचा देखील चमकते.(Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यात फिरण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 8:30 ते 9:30. सकाळी लवकर फिरायला जाणे चांगले. याचे कारण म्हणजे सकाळी शुद्ध हवा असल्या ऑक्सिजन देखील शुद्ध मिळतो. (Photo Credit : Pixabay)
संध्याकाळी फेरफटका मारणे चांगले. यावेळी थंडी पडण्याची भीती कमी असते. तथापि, संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान चालणे हिवाळ्यात थंड वाटण्याची शक्यता कमी करते. कारण वाढत्या थंडीमुळे हिवाळ्यात चालणे हानिकारक ठरू शकते.(Photo Credit : Pixabay)