Health News : म्हणून एकत्र टूथब्रश बाथरुममध्ये ठेवू नये, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का
जर तुम्ही तुमचे टूथब्रश वेगळे ठेवले नाही, तर अनगे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआत्तापर्यंत तुम्ही तुमचा टूथब्रश फक्त बाथरूममध्येच ठेवला असेल. त्यामुळे लोकांना असं वाटतं की, टूथब्रशसारख्या गोष्टी बाथरूममध्येच ठेवाव्यात.
पण जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल किंवा पीजीमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमचा टूथब्रश वेगळा ठेवणं फायदेशीर ठरु शकतं.
तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं असेल पण ही गोष्ट खरी आहे.
अनेकदा एकत्र कुटुंबात राहणारे लोक हे बाथरूममधील होल्डरमध्ये टूथब्रश ठेवतात.
यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
दंत तज्ज्ञांच्या मतानुसार, एकत्र कुटुंबातील लोकांनी बाथरूममध्ये टूथब्रश ठेवल्यास ते धुळीच्या संपर्कात येऊन अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते.
बाथरुममध्ये फ्लशच्या जवळ अनेक प्रकारचे विषाणू असतात.
त्यामुळे तुमचा टूथब्रश खराब होण्याची शक्यता असते.
तसेच टूथब्रश हा कायम सुखवूच त्याच्या कॅपमध्ये ठेवावा.