लठ्ठपणानं हैराण झालाय? 'ही' हिरवीगार फळं खा अन् स्लिम ट्रिम व्हा!
Green Fruits : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वात आधी आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. हिरवी फळं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. ही हिरवी फळं वजन कमी करण्यास मदत करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसफरचंद : वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचा आहारात नक्कीच समावेश करा. यामध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वं असतात जी वजन कमी करण्यासाठी मदत करतात.
नाशपती : वजन कमी करण्यासाठी नाशपाती हे अत्यंत फायदेशीर. यामध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच, यामध्ये कॅलरीही कमी असतात.
किवी : उत्तम आरोग्यासाठी किवीचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. किवीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. तसेच, यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
पेरु : पेरु पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण हाच पेरु आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असतो. पेरूच्या सेवनानं मेटाबॉलिज्म वाढतं. परुच्या सेवनानं शरीराला भरपूर जीवनसत्त्वं आणि फायबर मिळतात. पेरू खाल्ल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं. त्यामुळे सतत भूक लागत नाही.
अवोकाडो : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल, तर अवोकाडोचा आहारात समावेश करा. यामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, व्हिटॅमिन, खनिजं आणि इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
कलिंगड : कलिंगडही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कलिंगडामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
द्राक्षं : मर्यादित प्रमाणात द्राक्षं खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी होतो. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर फायटोस्टेरॉल, बीटा कॅरोटीन आणि पेक्टिन असतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.