Weight Gain Tips: वजन वाढवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश; पाहा सविस्तर...
शेंगदाणे - शेंगदाण्यात फॅट आणि कॅलरी असते, त्यामुळे ते वजन वाढण्यास मदत करतात. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये शेंगदाणे टाकून खाता येऊ शकतात. शेंगदाणे गरजेपेक्षा जास्त वजन वाढू देत नाहीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनुका - शरीरातील आवश्यक कॅलरीज पूर्ण करण्यासाठी मनुका फायदेशीर मानला जातो. तांबे, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे मनुकामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे वजन वाढवण्यासाठी मनुके फायदेशीर असतात.
बदाम - वजन वाढवण्यासाठी बदाम खायला हवे. बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि फॅट असल्यामुळे वजन अगदी सहज वाढू शकते.
पिस्ता - पिस्त्यामध्ये फॅट आणि कॅलरीज जास्त प्रमाणात आढळतात. वजन वाढवण्यासाठी दररोज पिस्त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
केळी - वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये केळीचा समावेश करा. वजन वाढवण्यासाठी तुम्हाला 3-4 केळी रोज खाव्या लागतील. केळीमध्ये पोषक तत्त्वे असतात. 1 वाटी दही किंवा दूधासोबत केळी खा, यामुळे तुमचे वजन झटपट वाढेल.
दूध आणि मध - रोज मध खाल्ल्याने वजन वाढते. दूधामध्ये एक चमचा मध टाकून प्यावे. सकाळी नाश्ता केल्यानंतर आणि रात्री झोपण्याआधी मध टाकलेले दूध प्यावे. यामुळे तुमची पचन शक्ती वाढेल आणि वजन देखील वाढण्यास मदत होईल.
सोयाबीन - सोयाबीनची भाजी, उकडलेले सोयाबीन किंवा सोयाबीनचा भात हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. सोयाबीन शरीराला मजबूत करते.