guinness world record Pune : मुलांना गोष्ट सांगून पुणेकरांनी केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; तीन हजाराहून अधिक पालकांनी मिळून मोडला चीनचा रेकॉर्ड
गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर नोंद झालाय. पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर तीन हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम पुण्यात घडलाय.
Continues below advertisement
guinness world record Pune
Continues below advertisement
1/9
गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर नोंद झालाय.
2/9
पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर तीन हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम पुण्यात घडलाय.
3/9
गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.
4/9
आतापर्यंत हा विश्वविक्रम चीनच्या नावावर होता.
5/9
चीनमधे एकाचवेळेस बावीसशे पालकांनी त्यांच्या मुलांना एकाचवेळी गोष्टी सांगीतल्या होत्या.
Continues below advertisement
6/9
नॅशनल बुक ट्रस्ट मार्फत आयोजित पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील एस पी कॉलेजच्या मैदानावर गोष्ट सांगण्याच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
7/9
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात ' वर्ल्ड बुक कॅपिटल ' होण्याची क्षमता आहे. या विश्वविक्रमाच्या निमित्ताने युनेस्कोचे निकष पूर्ण करण्याचा महापालिकेकडून प्रयत्न करण्यात आले आहे.
8/9
या उपक्रमात पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
9/9
यावेळी सुमारे 3हजारहून आधिक पालकांनी आपल्या पाल्यांना विविध गोष्टी, कथा वाचून दाखवल्या आहे यापूर्वीचा, पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी किंवा कथा सांगण्याचा विश्वविक्रम चीनच्या नावे असून, तो तोडण्यात पुणे यशस्वी ठरलं आहे.
Published at : 14 Dec 2023 11:15 AM (IST)