Kitchen Tips: टोमॅटोचे दर वाढले; आता 'या' पदार्थांनी वाढवा जेवणाची चव
टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली आहे. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही टोमॅटोशिवायही जेवणात चव आणू शकता? तर जाणून घेऊया जेवणात टोमॅटो समान चव आणणारे काही पदार्थ.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिंच: घरच्या घरी टोमॅटोला पर्याय म्हणून तुम्ही आंबट-गोड चिंच वापरू शकता. अर्ध्या वाटी पाण्यात थोडा वेळ चिंच भिजवून ठेवली आणि भाजी बनवताना टोमॅटोच्या जागी त्यात टाकली तर जेवणाला चांगली चव येते.
आमचूर पावडर: ही पाव़डर कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळेल. टोमॅटोला पर्याय म्हणून तुम्ही जेवणात सुक्या कैरीची पावडर वापरु शकता. तुम्ही कमी टोमॅटो आणि थोडी सुक्या कैरीची पावडर दोन्ही मिक्स करूनही भाजीत घालू शकता.
आंबट दही: दही हे सर्वच घरांत अगदी सहजपणे उपलब्ध होतं, रवीने दही एकजीव करुन भाजीमध्ये आंबटपणा आणण्यासाठी तुम्ही वापरु शकता. थोडे मसाले टाकून अगदी टोमॅटोप्रमाणे याची चव येते.
लिंबाचा रस: पदार्थात आंबटपणा घालण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता.
कोकम: कोकम हे लो कॅलरीसाठी ओळखलं जातं. फायबरने समृद्ध असलेल्या कोकमात टोमॅटोमध्ये असलेले सर्व जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात. त्यामुळे टोमॅटोऐवजी कोकम देखील तुम्ही जेवणात वापरू शकता.