Share Market Closing Bell: खरेदीच्या जोराने शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज दिसून आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.
Share Market Closing Bell: खरेदीच्या जोराने शेअर बाजार वधारला, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
1/10
आज मंगळवारी व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
2/10
ऑटो, एफएमसीजी आणि एनर्जी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्याच्या परिणामी शेअर बाजारात तेजी दिसली.
3/10
आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 273 अंकांनी वधारत 65,617 अंकांवर स्थिरावला.
4/10
निफ्टी 83 अंकांनी वधारत 19,439 अंकांवर स्थिरावला.
5/10
सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांचे शेअर तेजी दिसून आले. तर, निफ्टी 50 मधील 35 कंपन्यांचे शेअर्स वधारले.
6/10
ऑटो, आयटी, एफएमसीजी, फार्मा, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसला.
7/10
बँकिंग स्टॉक्समध्ये नफावसुली दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ही खरेदीचा जोर दिसला.
8/10
सन फार्मा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, नेस्ले, आयटीसी आदी शेअर्समध्ये तेजी दिसली.
9/10
बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
10/10
मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 1.72 लाख कोटींनी वाढले आहे. बीएसई मार्केट कॅप पुन्हा एकदा 300 लाख कोटींहून अधिक झाले आहे.
Published at : 11 Jul 2023 05:18 PM (IST)