World No Tobacco Day: आज जागतिक तंबाखू विरोध दिन, का असावं व्यसनमुक्त?
जेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जेव्हा एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहतो तेव्हा त्याला व्यसन असे म्हटले जाते. अशाच अनेक व्यसानांपैकी एक व्यसन म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच या व्यसानामुळे तुमचे मानसिक स्वास्थ बिघडण्याची देखील शक्यता असते. या व्यसनासाठी तुम्ही उगाच पैसे खर्च केल्याने तुमच्या आर्थिक परिस्थितीवर देखील परिणाम होण्याची शक्यता असते.
कर्करोग, क्षयरोग, हृदयविकाराचे त्रास यांसारख्या गोष्टींचा त्रास तुम्हाला या व्यसनामुळे निर्माण होऊ शकतो.
तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी व्यसनमुक्त असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला तंबाखूसारख्या व्यसनांनपासून दूर राहावे लागेल.
जर तुम्हाला या गोष्टीचे व्यसन अधिक प्रमाणात असेल तर ते सोडताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येऊ शकतात.
व्यसन सोडताना तुमची इच्छाशक्ती कमी पडली किंवा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर तुम्हाला व्यसनमुक्त होण्यास अडचण निर्माण होईल.
तंबाखूचे व्यसन हे इतर व्यसनांसारखेच घातक आहे. त्यामुळे जर तुमचे व्यसन सुटले तर तुम्ही पुन्हा चांगले आयुष्य जगण्यास सक्षम होऊ शकता.
जर तुम्ही व्यसनमुक्त राहिलात तर तुमचे आरोग्य निरोगी राहिल आणि तुमचे व्यक्तीमत्त्व चांगले राहण्यास मदत होईल.