Mobile Restart Problem : तुमचा नवीन मोबाईल स्लो झाला असेल, तर या ट्रिकचा करा वापर; प्रोसेस होईल फास्ट!
आपण मोबाईल विकत घेताना त्याच्यातील अनेक गोष्टींचा विचार करून घेतो. यामध्ये मोबाईलचा प्रोसेसर, बॅटरी, कॅमेरा आणि रॅम इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. मोबाईल योग्य पद्धतीने परफॉर्म करण्यासाठी त्याच्या प्रोसेसरची महत्वाची भूमिका असते. कारण मोबाईलच्या प्रोसेसरमध्ये काही गडबड असेल, तर तुमचा मोबाईल स्लो होऊ शकतो किंवा काही वेळ तुमचा मोबाईल अचानक स्लो होऊ बंद पडतो. अशा वेळी एक ट्रिक वापरा. तुमचा मोबाईल पुन्हा नवीन मोबाईलसारखा परफॉर्म करेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्याकडे कितीही महागडा मोबाईल असला, तरी कधी ना कधी त्याच्यात समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी एक ट्रिक आहे.
या ट्रिकचा वापर केल्यामुळे तुमच्या मोबाईलची सहज समस्या सुटू शकते.
तुम्ही आयटी प्रोफेशनल्स लोकांना काम करताना पाहिले असेल ते मोबाईल/टॅबलेट/कम्प्युटर आधी बंद करून पुन्हा सुरू करतात. ही ट्रिक वापरून ते मोबाईल रिस्टार्ट करतात.
या ट्रिकचा तुम्ही सुद्धा वापर करू शकता. यामुळे तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरची समस्या झटक्यात सुटू शकते.
तुमचा मोबाईला Restart केल्यामुळे डाउनलोड केलेले सॉफ्टवेअरचे अपडेट्स Install होतात. यासोबत नेटवर्कची समस्याही दूर होऊ शकते.
मोबाईल Restart केल्यामुळे डिव्हाईसमधील मेमरी क्लिअर होते. तसेच मोबाईलमधील धोकादायक अॅपला बंद करतं. यामुळे तुमचा मोबाईल नवीन मोबाईलसारखा परफॉर्म करू शकतो. याशिवाय मोबाईल Restart केल्यानंतर Battery Optimization आणि Memory Management मध्ये सुधारणा करण्यास मदत मिळते.
आयटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुमचा मोबाईल आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा Restart करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय सॅमसंग कंपनीकडून Galaxy phone दररोज Restart करण्याचा सल्ला दिला जातो.
बऱ्याच अँड्रॉईड मोबाईलमध्ये Restart करण्यासाठी Power बटणला Long Press केलं जातं. याशिवाय काही अँड्राईड मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक Reboot बटणला शेड्यूल करण्याचा पर्याय दिला जातो. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला Restart When Needed च्या टॉगलला ऑन करून सेट करू शकता.