प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिणे धोकादायक!
प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बिसफेनोल ए (BPA) हे एक रसायन असतं. हे पाण्यासोबत मिसळून शरीरात गेल्यास हानीकारक ठरू शकतं. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते. (Photo Credit : pixabay)
पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवल्यास आणि ते पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकतं. (Photo Credit : pixabay)
कारण सूर्यकिरणांमुळे BPA रसायन पाण्यात तातडीने मिसळलं जातं. (Photo Credit : pixabay)
प्लॅस्टिकची बाटली योग्यप्रकारे न धुतल्यास त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. (Photo Credit : pixabay)
प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) वाईट परिणाम होतो. (Photo Credit : pixabay)
प्लास्टिकच्या बाटलीतून बाहेर पडणारे रसायन पचत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर होतो. (Photo Credit : pixabay)
प्लास्टिकमध्ये फॅलेट नावाचे रसायन असते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो (Photo Credit : pixabay)
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm Count) कमी होऊ शकते. याचा थेट त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. (Photo Credit : pixabay)
प्लॅस्टिकमध्ये आढळणारी रसायने जसे की शिसे, कॅडमियम आणि पारा शरीरात कर्करोग, अपंगत्व, रोगप्रतिकारक शक्तीमध्ये अडथळा येणे यांसारखे गंभीर आजार निर्माण करतात आणि मुलांच्या विकासावरही परिणाम करतात.(Photo Credit : pixabay)