चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे,झोपण्याची पद्धत, 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते
आपल्या दिवसभरातील काही सवयीच आपल्या पाठीचं दुखणं, कांध्यांचं दुखणं मानेचं दुखणं आणि अन्य समस्यांचं कारण ठरतात. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये सलग काही तास एकाच जागी बसणे, चुकीच्या पद्धतीने वाकून उठणे, झोपण्याची पद्धत, एक्सरसाईज न करणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. (Photo credit: Unsplash)
वेळीच जर तुम्ही अशा समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला नाही तर कधीकधी जाणवणारं हे दुखणं कायमस्वरूपी देखील होऊ शकतं. यासाठी तुमच्या ऑपरेशनची देखील वेळ येऊ शकते. (Photo credit: Unsplash)
झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत सरळ तुमच्या पाठीच्या कण्याला प्रभावित करते.(Photo credit: Unsplash)
फक्त बसण्याची चुकीची पद्धतच नाही तर उभे राहण्याची चुकीची पद्धत देखील लोअर बॉडी पेन साठी कारणीभूत ठरतो. अशीच काही कारणे आणि त्यावरचे उपाय या संदर्भात जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)
खांद्यावर जास्त वजन घेणे ऑफिसला जाताना अनेकांना आपल्या बॅगेत भरपूर सामान घेऊन बॅग एकाच खांद्यावर लावण्याची सवय असते. (Photo credit: Unsplash)
अशा वेळी ट्रेनने, बसने उभ्याने प्रवास करणे तुमच्या पाठीच्या कण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.(Photo credit: Unsplash)
यासाठी तुम्ही बॅगेत कमी सामान भरणं, किंवा बॅग खाली ठेवणं, तसेच बॅग एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर सतत ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण, मोबाईलच्या अति वापरामुळे तुमच्या मानेवर, पाठीवर आणि खांद्यावर प्रेशर येऊन तो त्रास वाढू शकतो.(Photo credit: Unsplash)
चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे नकळतपणे आपण सर्वच या चुका नेहमी करत असतो. (Photo credit: Unsplash)
वजन उचलण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खाली वाकतो. यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच तुमच्या कमरेला चमक देखील येऊ शकते. (Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)