Health Tips : हिरवी वेलची पुरुषांसाठी आरोग्यदायी; जाणून घ्या याचे फायदे

हिरव्या वेलचीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. वेलची अन्नाची चव किंचित वाढवते. याशिवाय वेलचीचा चहाही चविष्ट लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वेलची जेवढी चवीला चविष्ट आहे, तेवढीच ती आरोग्यासाठीही अद्भूत आहे. त्याच्या मदतीने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकता.

पुरुषांपासून महिलांपर्यंतच्या समस्या वेलचीच्या मदतीने दूर होऊ शकतात. वेलचीचे फायदे नेमके कोणते ते जाणून घ्या.
पुरुषांच्या शारीरिक कमकुवतेवर मात करण्यासाठी हिरवी वेलची खूप आरोग्यदायी ठरू शकते. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी वेलची 1 ग्लास कोमट दुधात उकळून घ्या.
वेलचीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकारांनाही आळा बसू शकतो.
पुरुषांमध्ये लघवीशी संबंधित समस्या असल्यास हिरवी वेलची खूप प्रभावी ठरते. तसेच तुम्ही माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा वेलचीचा वापरू शकता. यासाठी जेवल्यानंतर नियमितपणे 2 ते 3 वेलची चावावी. यामुळे तुमच्या शरीराचे वजनही नियंत्रित राहील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.