Health Tips : अन्नाची चव वाढविण्याबरोबरच काळीमिरीचे आहेत अनेक फायदे
हिंदी भाषेत काली मिर्च (kali mirch) आणि इंग्रजीत black pepper म्हणून ओळखल्या जाणाऱ्या black pepper ला मराठी मध्ये “काळी मिरी” म्हटले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वयंपाकघरातील पदार्थांत तिखट स्वाद आणणाऱ्या काळीमिरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
जेवणाचा स्वाद वाढविण्या सोबतच काळीमिरी ही भूक वाढवण्याचे देखील कार्य करते.
काळीमिरी पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड चा स्त्राव वाढवते. यामुळे व्यक्तीची पचनशक्ती वाढते.
पचनशक्ती सुधारण्यासोबतच काळीमिरी पोटातील सूजन, पोट फुगणे, अपचन, पोटात गॅस तयार होणे आणि बद्धकोष्टता च्या समस्येपासून मुक्ती देते.
सर्दी खोकला ची समस्या असल्यास काळी मिरी चे 2 ग्राम चूर्ण गरम दूध सोबत प्यावे. यासोबत काळीमिरीचे 7 दाणे गिळून घ्यावेत. असे केल्याने सर्दी खोकला कमी होतो.
ताप येत असल्यास एक चमचा काळी मिरी पावडरमध्ये अर्धा लिटर पाणी आणि 2 चमचे मिश्री टाकून चांगले उकळावे. यानंतर हा काढा सकाळ संध्याकाळी प्यावा. असे केल्यास दात मध्ये आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.