Health Tips : एका डाळिंबात आहेत अनेक पोषक गुणधर्म; पाहा फायदे
डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्यात मधुमेह, कर्करोग, अल्झायमर, लठ्ठपणा यांसारख्या आजारांशी लढण्याची क्षमता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष बाब म्हणजे डाळिंब शरीरात रक्ताभिसरण नियंत्रित ठेवते. ज्यामुळे तुम्ही आजारी पडत नाही.
डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड्स सारखे पोषक घटक असतात, जे तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दोन आठवडे दररोज 150 मिली डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो.
डाळिंबात भरपूर पोषक घटक असतात. पण त्यात फारच कमी कॅलरीज आढळतात, ज्यामुळे खाल्ल्यानंतर पोट भरलेले राहते.
जर तुम्हाला वजन झपाट्याने नियंत्रित कमी करायचे असेल तर दिवसभरात एक डाळिंब खा किंवा त्याचा रस प्या.
ज्या पुरुषांना शारीरिक अशक्तपणा, थकवा यांसारख्या समस्या आहेत त्यांच्यासाठी डाळिंबाचे सेवन खूप फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.