Health Tips : अळशीच्या बियांचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
अळशीच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा, केस आणि पचनाची समस्या दूर करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बियांचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअळशीच्या बिया खाणे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. अळशी खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.
अळशीच्या बिया हे एक सुपर फूड आहे. जे खाल्ल्याने तुम्हाला पूर्ण पोषण मिळते.
अळशीच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम, फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड यांसारखे सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात.
अळशीच्या बिया खाल्ल्याने तुमची त्वचा सुधारते आणि त्वचा चमकदार होते.
अळशीमध्ये आढळणारे पोषण आणि खनिजे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 असते आणि त्यात भरपूर फायबर असते. अळशी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते.
अळशीच्या बियांमध्ये आढळणारे काही पोषक तत्व जळजळ, पार्किन्सन रोग आणि दमा यांसारख्या आजारांना दूर ठेवतात.
अळशी खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत. अळशी मधुमेह आणि रक्तदाब देखील नियंत्रित करतात.