Health Tips : आरोग्यासाठी गुणकारी सब्जाचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे
आजकाल बरेच लोकसब्जाच्या बियांचे सेवन करू लागले आहेत. सब्जाच्या बियांच्या फायद्यांमुळे सुपरफूडच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसब्जाच्या बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह खनिजे देखील आढळतात. सब्जाच्या बिया खाल्ल्याने वजन कमी होण्यास खूप मदत होते.
सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते जे पचायला बराच वेळ लागतो. हे खाल्ल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तुम्ही वारंवार खाण्याची सवय टाळता, त्यामुळे वजनही झपाट्याने कमी होते.
सब्जाच्या बिया खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीरातील मीठाचे प्रमाण सामान्य राहते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी सब्जाच्या बियांचे सेवन करावे.
सब्जाच्या बिया हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी त्यांच्या आहारात चिया बियांचा समावेश केला पाहिजे. सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रक्तदाब सामान्य राहतो.
सब्जाच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते, हृदयविकाराचा धोका कमी होतो. म्हणून, आपण आहारात दाहक-विरोधी गुणधर्मांसह अन्न समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीरातील अनेक आजारांना आळा बसतो.
सब्जाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्तीला फायदा देतात. रोज सब्जाच्या बिया खाल्ल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.