Health Tips : दृष्टी वाढविण्यासाठी बडीशेप आणि साखर आहे गुणकारी!
बडीशेप आणि साखर खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहाल. यामध्ये झिंक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. उन्हाळ्यात बडीशेप आणि साखर खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबडीशेप आणि साखर खाल्ल्याने तोंडात ताजेपणा तर येतोच तसेच अन्न पचायलाही मदत होते. बडीशेपमध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनक्रिया लगेच सक्रिय होते. बडीशेप आणि साखर खाल्ल्यानंतर अन्नपचन जलद होते.
जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खावी. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. बडीशेप आणि साखर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीरातील रक्तप्रवाहही सुधारतो.
बडीशेप आणि साखर खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात. यामुळे दृष्टी सुधारते. बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्यास तुमची दृष्टी सुधारेल. यामुळे तुमचा चष्म्याचा नंबर कमी होण्यासही मदत होईल.
जर तुम्हाला खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खावी. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात.
जेवणानंतर तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही माऊथफ्रेशनर म्हणून बडीशेप आणि साखर खाऊ शकता. त्यामुळे तोंडाला वास येणार नाही. बडीशेप आणि साखर खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. हे तोंडाची पीएच पातळी (ph Level) राखण्यासाठी देखील मदत होते आणि बॅक्टेरिया दूर ठेवते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.