Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अननसाचे 'हे' आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा अधिक समावेश करावा. फळांमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे चयापचय सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलठ्ठपणा कमी करण्यासाठी अननसाचे सेवन केले पाहिजे, यामुळे वजन कमी होईल आणि हाडे मजबूत होतील.
अननसात कॅलरी कमी आणि कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
यामध्ये उच्च ब्रोमेलेन फायबर आढळते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते.
अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो. या हार्मोनद्वारे शरीरातील वजन नियंत्रित करता येते. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्या शरीरात लेप्टिनचे प्रमाण जास्त असते.
हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचे सेवन करावे. यामध्ये मॅंगनीज आणि कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांची कमजोरी दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.