Health Tips : पुदिना आरोग्यासाठी गुणकारी, जाणून घ्या याचे अनेक फायदे
उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी पुदिना का सर्वात जास्त फायदेशीर आहे. जाणून घ्या पुदिन्याचे कोणते फायदे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात अपचनाची समस्याही सुरू होते. त्यामुळे लोक जेवण टाळतात. एवढेच नाही तर, उन्हात बाहेर पडल्यावर उष्माघात होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे आजारी पडण्याची भीती निर्माण होते. अशा परिस्थितीत या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पण, त्याचा काही विशेष परिणाम होताना दिसत नाही. यावर रामबाण उपाय म्हणजे पुदिन्याची पाने. पुदिन्याच्या पानांमध्ये इतके पोषक तत्व असतात जे या सर्व समस्या दूर करतात. .
खरंतर, पुदिना आपल्या पोटासाठी, त्वचेसाठी आणि तोंडासाठी फायदेशीर आहे. प्रत्येकाने पुदिन्याचे सेवन अवश्य करावे. तुमच्या त्वचेसाठी पुदिना कसा फायदेशीर आहे ते जाणून घ्या.
1. तोंडाची दुर्गंधी दूर करते - अनेकदा ऑफिसच्या वेळेत कांदा खाण्याची भीती वाटते. कारण कांदा खाल्ल्याने लगेच तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत पुदिन्याची पाने ही दुर्गंधी दूर करू शकतात. पुदिन्याच्या पानांचा सुगंध खूप सुवासी असतो. ही पाने खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.
2. चेहऱ्याला थंडावा देते - उन्हाळ्याच्या त्वचा खूप कोरडी होते बऱ्याचदा कोरडीही पडते. अशा परिस्थितीत चेहरा जिवंत राहावा आणि त्वचा तजेलदार राहावी यासाठी चेहरा थंड ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी पुदिन्याची पाने बारीक करून संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचाही चांगली राहते आणि चेहऱ्यालाही थंडावा मिळतो.
3. उष्णतेपासून संरक्षण - उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे अनेकदा लोकांना उष्माघात होतो. परिणामी आजारी पडण्याची लक्षणं जास्त दिसतात. अशा परिस्थितीत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पुदिन्याची पाने खूप प्रभावी ठरतात. कारण पुदिन्याच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात, जे शरीराला उष्माघातापासून वाचविण्यास मदत करतात. पुदिन्याचा रस पिऊन थोडासा दिलासा मिळतो. तसेच पोटाला थंडावाही मिळतो.
4. अन्न पचण्यास मदत - उन्हाळ्यात अन्न लवकर पचत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पुदिन्याचे सेवन करा. कारण पुदिन्याची पाने पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरतात. पुदिन्याची काही पाने बारीक करून त्यात कांद्याचा रस आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. यामुळे अन्न पचनास मदत होईल.
5. उलटीपासून बचाव - उन्हाळ्यात अनेकदा गॅस किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने उलट्यांचा त्रास सुरू होतो. उलट्या थांबविण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा रस प्या. उलट्या लगेच थांबतील. अशा प्रकारे, उलट्या रोखण्यासाठी देखील पुदिना फायदेशीर ठरतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.