थायरॉडच्या रुग्णांनी चुकनही खाऊ नका हे पदार्थ, जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे पदार्थ तुमची थायरॉईड स्थिती बिघडू शकतात आणि समस्या निर्माण करू शकतात.
सोया थायरॉईडच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नये.कारण सोयामध्ये गॉइट्रोजन नावाचे तत्व असते, ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीची मोठी हानी होते.
प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे नूडल्स, सॉस, केचप, जाम, मॅजिक मसाला इत्यादी प्रक्रिया केलेले पॅकेट खाद्यपदार्थ थायरॉईडच्या रुग्णांसाठी अजिबात फायदेशीर नाहीत.
थायरॉईडसाठी कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली या भाज्या ज्यांना ब्रासिका व्हेजीज म्हणतात, त्या अजिबात खाऊ नयेत.
या भाज्यांमध्ये थायरॉईड विरोधी संयुगे भरपूर प्रमाणात असतात ज्यांना गोइट्रोजेन्स म्हणतात जे थायरॉईडच्या सामान्य कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतात.
थायरॉईडची समस्या असलेल्या लोकांनी जंक फूड म्हणजेच फास्ट फूडपासून पूर्णपणे दूर राहावे. या प्रकारचे अन्न सहसा भरपूर चरबी, मीठ आणि कॅलरींनी समृद्ध असते जे थायरॉईडसाठी अजिबात चांगले नसते.
कॅफिनमुळे थायरॉईड ग्रंथीमध्ये थायरॉईड संप्रेरक तयार होण्याच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हार्मोन्सची पातळी बिघडू शकते.