Health News : नखांवर पांढरा डाग असण्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर

नखांवर पांढरे डाग आपल्या आरोग्याविषयी अनेक संकेत देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डेली स्टार या संस्थेच्या अहवालानुसार, नखांवर पांढरे डाग असणं हे शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता दर्शवतात.

तसेच डिहायड्रेशन आणि त्वचेशी संबंधित आजारांचे देखील संकेत हे डाग देतात.
जेव्हा शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा नखांवर हे पांढरे डाग दिसतात.
तज्ज्ञांनुसार, व्हिटॅमिन ए सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे किंवा प्रोटीन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे पांढरे डाग नखांवर तयार होतात.
नखांवर पांढरे डाग असणं हे किडनीच्या आजारांचे देखील लक्षण असू शकते.
तसेच शरीरात लोहाची देखील कमतरता असल्याचं म्हटलं जातं.
जर तुम्हाला तुमच्या नखांवर हे डाग सातत्याने दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कारण हे शरीरात पोषण तत्वांची कमतरता असल्याचं लक्षण आहे.