Chest Pain: छातीत सारखं दुखतयं? 'ही' असू शकतात कारणं
ऑक्सिजनची कमतरता - शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण राखणे खूप महत्वाचे आहे. आजच्या जीवनशैलीमुळे तसे करणे कठीण झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर शरीरात ऑक्सिजनची कमतरता असेल तर त्याचा पहिला परिणाम छातीवर होतो, जिथे वेदना होऊ लागतात. अशा परिस्थितीत शरीराला विश्रांती देणे आवश्यक होते.
स्नायूंचे दुखणे - जर तुम्हाला छातीत दुखत असेल तर ते स्नायूंच्या दुखण्याशी देखील संबंधित असू शकतं. जेव्हा फुफ्फुसात कोणतीही समस्या उद्भवते तेव्हा छातीत दुखायला सुरुवात होते.
याशिवाय पाठ, मान किंवा पोटदुखीमुळेही छातीत दुखते. अशा परिस्थितीत त्यावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
हृदयविकाराचा झटका - जेव्हा हृदयातील टिशूंमध्ये रक्ताचा प्रवाह योग्यरित्या होत नाही, तेव्हा छातीत दुखण्यास सुरुवात होते. खरंतर टिशूंमध्ये होणाऱ्या वाईट परिणामांमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडचण निर्माण होते.
त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेक वेळा छातीत रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे छातीत दुखत असल्याचेही दिसून येते.
चुकीच्या पध्दतीने झोपणे - जर तुम्ही योग्य पध्दतीने झोपत नसाल तर तुम्हांला तुमच्या झोपण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
झोपेची वाईट सवयी हे देखील छातीतील दुखण्याचं एक कारण ठरु शकतं. अनेकवेळा आपण पोटावर झोपतो, त्यामुळे छातीत वेदना होऊ लागतात. म्हणूनच झोपण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे.