Hair care : तेल आणि हे घटक एकत्र वापरा, केसांना बनवा आकर्षक !

केसांना आकर्षक, घनदाट बनवण्यासाठी तेलापेक्षा चांगले काहीही नाही. आज आम्ही तुम्हाला तेलामध्ये काही आवश्यक घटक मिसळून केसांच्या समस्या कशा दूर करू शकता हे सांगणार आहोत. जाणून घ्या तेलाच्या काही पाककृतींबद्दल. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मोहरीचे तेल : केसांना जीवदान देण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. कोरड्या केसांसाठी मोहरीचे तेल खूप चांगले आहे. [Photo Credit : Pexel.com]

केसगळती रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे. चांगल्या परिणामांसाठी, मोहरीचे तेल रात्रभर केसांना लावून ठेवा आणि सकाळी धुवा. [Photo Credit : Pexel.com]
कढीपत्ता आणि खोबरेल तेल : केसांना नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. यामुळे केस मजबूत होतात आणि केस तुटणे टाळता येते. [Photo Credit : Pexel.com]
8 ते 10 कढीपत्ता आणि अर्धा कप खोबरेल तेल लागेल.कढईत खोबरेल तेल गरम करा. त्यात कढीपत्ता घाला आणि तेल काळे होईपर्यंत उकळवा. थंड होऊ द्या. यानंतर टाळूला मसाज करा. सुमारे तासभर केसांवर राहू द्या. [Photo Credit : Pexel.com]
तुळस आणि मेथीचे तेल: तुळशीमध्ये अनेक वैद्यकीय गुणधर्म आहेत. हा खूप चांगला स्ट्रेस बस्टर आहे. केस मजबूत करण्यासाठी तुळशीचे तेल प्रभावी आहे. कोरड्या केसांसाठी हे खूप चांगले आहे. टाळूचे रक्ताभिसरणही वाढते. [Photo Credit : Pexel.com]
10 चमचे तुळशीची पेस्ट, अर्धा कप खोबरेल तेल घ्या. त्यात दोन ते तीन मेथी दाणे टाका.खोबरेल तेल मध्यम आचेवर गरम करा. कोमट तेलात तुळशीची पेस्ट मिक्स करा. त्यात मेथीचे दाणे टाका. हे मिश्रण टाळूवर लावा. [Photo Credit : Pexel.com]
आवळा आणि खोबरेल तेल- आवळा व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोहाने समृद्ध आहे. केसांना चमक देण्यासोबतच ते काळेही करतात. [Photo Credit : Pexel.com]
1 ते 2 आवळे घ्या ते बारीक करा आणि त्याचा रस तयार करा. आवळ्याच्या रसात खोबरेल तेल मिसळा व हे मिश्रण थोडे कोमट करा. यानंतर हे तेल केसांना लावा. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]