Mouni Roy: मौनी रॉयच्या 'बदमाश' रेस्टॉरंटची स्टायलिश झलक पाहिली का? खवय्यांचं चोचले पुरवणारं ठिकाण
प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनी ही सध्या तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या नव्या रेस्टॉरंटमुळे चर्चेत आहे.
मुंबईमध्ये मौनीनं एक नवं रेस्टोरंट ऑपन केलं आहे. या रेस्टॉरंटचं नाव बदमाश असं आहे. नुकतेच मौनीनं तिच्या या रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मौनी रॉयच्या मुंबईत 2 रेस्टॉरंट चेन आहेत. ज्याचे फोटो ती सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते.
मुंबईतील कमला मिल्स आणि अंधेरी वेस्ट येथे मौनीचे 'बदमाश'रेस्टॉरंट आहे. यामधील कमला मिल्स येथील 'बदमाश' रेस्टॉरंटचे फोटो मौनीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मौनीच्या 'बदमाश' या रेस्टॉरंटमध्ये विविध पदार्थ आणि ड्रिंक्सचे प्रकार खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.
मौनीनं तिच्या या जंगल थीम रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनेक सेलिब्रिटींनी मौनीच्या 'बदमाश' या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.
मौनीच्या 'बदमाश' हे रेस्टॉरंटचे फोटो पाहिल्यानंतर तरुणांसाठी नवे हँग आऊट प्लेस ठरेल, असं म्हणता येईल.