Coriander Health Benefits : कोथिंबीर डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
कोथिंबीर ही सहसा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच. स्वयंपाक घरात शिजणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाला चव वाढवणारी कोथिंबीर अनेकांच्या आवडीची आहे. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोथिंबीर ही वाटणासाठी, खाद्यपदार्थांवर गार्निशिंग (सजावटीसाठी) करण्यासाठी आवर्जून वापरली जाते.भाज्यांच्या वाटणामध्ये कोथिंबीर महत्वाची भूमिका बजावते. हिरवीगार कोथिंबीर आपल्या जेवणाचा आस्वाद वाढवते, यात काही शंका नाही.(Photo Credit : Pixabay)
पण, कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर, अनेक आजारांमध्ये कोथिंबीरचा आहारात समावेश असणे हे फार महत्वाचे मानले जाते. कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. जाणून घ्या कोथिंबीरचे आरोग्यदायी फायदे.(Photo Credit : Pixabay)
डोळ्यांसाठी फायदेशीर : हिरव्या कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन A चे प्रमाण भरपूर असते.(Photo Credit : Pixabay)
हे व्हिटॅमिन A डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे, तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही कोथिंबीरचा समावेश करू शकतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकेल.(Photo Credit : Pixabay)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : कोथिंबीरमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. (Photo Credit : Pixabay)
या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमिन C चा ही समावेश आहे. कोणत्याही जंतू संसर्गापासून आपल्या शरिराला दूर ठेवण्याचे काम व्हिटॅमिन C करते. त्यामुळे, आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास कोथिंबीर लाभदायी ठरते.(Photo Credit : Pixabay)
किडनीच्या विकारांमध्ये लाभदायी : कोथिंबीर ही किडनीच्या विकारांमध्ये देखील लाभदायी ठरते. अनेक संशोधनांमधून हे समोर आले आहे की, कोथिंबीर आपल्या किडनीच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. (Photo Credit : Pixabay)
कोथिंबीरमध्ये असलेल्या पोषणतत्वांमुळे किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे, ज्यांना किडनीचे आजार आहेत, अशा लोकांनी त्यांच्या आहारात कोथिंबीरचा समावेश जरूर करावा.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)