Heatwave : उष्णता वाढली, काय घ्याल काळजी?
राज्यात उष्णतेत पुन्हा वाढ होणार आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात चार ते सहा अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. आज कमाल तापमानात मोठी वाढ दिसणार आहे. तर दुसरीकडे विदर्भात मात्र काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभाागानं वर्तवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउष्णतेत योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.. पाहूयात काय काळजी घ्यावी...
बाहेर जाताना डोकं झाका म्हणजे उन्हापासून बचाव होईल.
दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा. तसेच सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका.
जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे.
उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका. विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका.
सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) याचा वापर करा.
त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा. घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका.