Hyundai Exter First Look Review : दमदार फिचर्ससह SUV Exter सुसज्ज; 'या' कारशी होणार स्पर्धा
भारतीय बाजारात एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील परवडणाऱ्या दरात आता आणखी एका कारची एन्ट्री झाली आहे. Hyundai ने भारतात आपली सर्वात लहान आणि सर्वात कॉम्पॅक्ट SUV Hyundai Exter लॉन्च केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppExter चे केबिन तुम्हाला लगेच Nios ची आठवण करून देईल. डॅशबोर्डवरील वेव्ह-पॅटर्न, तीन-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि अगदी आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम हॅचबॅक सिबलिंगकडून घेण्यात आली आहे.
Exter च्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, या कारचा लूक आकर्षक आणि क्लासी आहे. एक्स्टरला उंच आणि सरळ स्टॅन्स आहेत. तसेच, समोरच्या फॅसिआमध्ये सिग्नेचर एच-आकाराचे एलईडी डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे जे टेललॅम्प क्लस्टरमध्ये देखील आहेत.
एक्स्टरच्या कलर ऑप्शन्समध्ये सहा मोनोटोन आणि तीन ड्युअल-टोन शेड्सचा समावेश आहे. यामध्ये कॉस्मिक ब्लू आणि रेंजर एक्स्टरच्या पॅलेटमध्ये नवीन आहेत, तर अॅटलस व्हाईट, टायटन ग्रे, स्टाररी नाईट आणि फायरी रेड हे ब्रँडच्या रंगसंगतीचा एक भाग आहेत.
एक्स्टरची सुरुवातीची शोरूम किंमत 6 लाख पासून सुरु होते ती 7.97 लाखांपर्यंत आहे. तसेच, या कारची स्पर्धा टाटा पंचशी होणार आहे.