Boost your kids memory : लहान मुलांची ' स्मरणशक्ती ' वाढवायची आहे ? हे उपाय करा
काही मुलांची स्मरणशक्ती खूप कमकुवत असते. ते गोष्टी लक्षात ठेवतात आणि विसरतात किंवा त्यांना अक्षरे लक्षात ठेवण्यास किंवा काहीही लक्षात ठेवण्यास त्रास होतो . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया समस्या सामान्य समजून पालक त्याकडे दुर्लक्ष करतात , पण नंतर जेव्हा ही समस्या वाढू लागते तेव्हा ही चिंतेची बाब बनते . [Photo Credit : Pexel.com]
सुरुवातीलाच काही उपाय करून ही समस्या थांबवली तर ती गंभीर स्वरूप धारण करत नाही. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही पुढील उपाय करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
पझल / कोडे खेळण्यास दया : मुलांना गेम्स खेळायला लावल्याने त्यांचा विकास होतो असे काही खेळ आहेत जे त्यांच्या मानसिक विकासासाठी उपयुक्त आहेत, जसे की कोडे / पझल. हे खेळल्याने मुलांच्या स्मरणशक्तीवर चांगला परिणाम होतो.[Photo Credit : Pexel.com]
मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा : मुलं बाहेर फिरायला जातात तेव्हा ते नवीन गोष्टी शिकतील , समजून घेतील आणि त्यांच्या मनात त्या पुन्हा पुन्हा सांगतील. यामुळे त्यांचे ज्ञान तर वाढेलच शिवाय त्यांचा मानसिक विकासही होईल . [Photo Credit : Pexel.com]
मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही हा सराव उपयुक्त ठरतो. अशा परिस्थितीत मुलांची व्याप्ती फक्त घरापुरती मर्यादित ठेवू नका . त्यांनाही बाहेर फिरायला घेऊन जा . [Photo Credit : Pexel.com]
झोप :जर मुलांना पुरेशी झोप मिळाली तर त्याची स्मरणशक्ती वाढू शकते . झोपेमुळे मुलांची विचारशक्ती , समज आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते . [Photo Credit : Pexel.com]
अशा स्थितीत मुलांना पुरेशी झोप न मिळाल्यास त्यांच्या विचार आणि आकलनशक्तीवर परिणाम होतो . [Photo Credit : Pexel.com]
पोषक तत्वांचा समावेश : मुलांच्या आहारात बदल करूनही स्मरणशक्ती वाढवता येते . मुलांच्या आहारात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी1, बी12, बी6, आयर्न, आयोडीन इत्यादी घटकांसह अँटीऑक्सिडंट घटक मुलांच्या आहारात समाविष्ट केले तर त्यांची विचारशक्ती सुधारते . [Photo Credit : Pexel.com]
मुलांना मोठ्याने वाचायला सांगा : जर मुलांनी गोष्टी त्यांच्या मनात वाचल्या तर त्यांना त्या लवकर आठवत नाहीत आणि ते पटकन विसरतील . अशा वेळी तुमच्या मुलांना ते जे काही वाचत असतील ते मोठ्याने वाचायला सांगा . [Photo Credit : Pexel.com]
मोठ्याने वाचन केल्यामुळे त्यांना स्वतःचा आवाज ऐकू येईल आणि लक्षात ठेवणे सोपे जाईल . मुले त्या गोष्टी मोठ्याने वाचून लक्षात ठेवतात . [Photo Credit : Pexel.com]
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]