Tea and Coffee : चहा, कॉफी पिण्याआधी पाणी पिणं योग्य?
पण आता प्रश्न असा उपस्थित होतो की चहा पिण्याआधी पाणी पिणं योग्य आहे का? चहा पिण्याआधी पाणी पिल्यामुळे काय होते सविस्तर जाणून घेऊया.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचहा आणि कॉफी दोन्ही आम्लयुक्त असतात हे बहुतेकांना माहीत नसते. या दोन्ही गोष्टी पोटात गॅस बनवण्याचे काम करतात.
एका रिपोर्टनुसार, चहा पिण्याआधी पाणी प्यायल्यास चहाचा ऍसिडिक प्रभाव कमी होतो. पाणी प्यायल्याने आतड्यात एक थर तयार होतो, ज्यामुळे आम्लाचा प्रभाव कमी होतो.
चहा पिण्याआधी पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पीएच पातळीही संतुलित राहते. पाण्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात.
जर तुम्ही चहा पिण्याआधी पाणी पित असाल तर हे कायम लक्षात ठेवा की या दोघांमध्ये 15 मिनिटांचे अंतर ठेवावे. त्यामुळे तुम्हांला अधिक फायदा होण्याची शक्यता असते.
चहापूर्वी पाणी पिण्याची सवय कितपत योग्य आहे हे तुम्ही कशाप्रकारे त्याचे सेवन करता यावर अवलंबून असल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे.