PHOTO: केशर आहे हिवाळ्यातील सुपरफूड, जाणून घ्या आहारात त्याचा समावेश कसा करावा
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणं खूप गरजेचं असतं. थंडीत सर्दी-खोकला,इत्यादी समस्या सामान्य असतात. केशर आपल्याला हिवाळ्यात या आजारांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवणात केशरचा अनेक प्रकारे वापर करून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता.
हिवाळ्यात केशरचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ते बनवण्यासाठी एका कढईत पाणी उकळून त्यात केशर, लवंग आणि दालचिनी घालून हे मिश्रण चांगले उकळून घ्यावे. हवं असेल तर त्यात वेलचीही घालू शकता. आता गाळून हिवाळ्यात या चहाचा आस्वाद घ्या. हे प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर उबदार राहते.
रात्री झोपण्यापूर्वी केशराचे दूध पिऊ शकता. केशराचा सौम्य सुगंध आणि चव सुखद अनुभूती देते.
दररोज केशराचे दूध प्यायल्याने तणावापासून मुक्ती मिळते. बऱ्याच आरोग्याच्या समस्याही दूर होण्यास मदत होते
हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी केशर आणि मधाचे मिश्रण हा एक प्रभावी मार्ग आहे. यासाठी मधात केशराचे धागे मिसळून खा, दररोज एक चमचा घेऊ शकता. त्याची चवही खूप छान लागते.
हिवाळ्यात अनेकदा सर्दीने लोक त्रस्त असतात, त्यामुळे तुम्ही केशराची वाफ घेऊ शकता. यासाठी कोमट पाण्यात चिमूटभर केशर घालून टॉवेलने डोके झाकून वाफ घ्यावी. यामुळे सर्दीपासून आराम मिळू शकतो.
केशरमुळे होणाऱ्या फायद्यांमध्ये डोळ्यांच्या दृष्टीचा ही समावेश आहे. केशरमुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढते. केशरमध्ये अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत, ज्यामुळे डोळ्यांतील रक्त प्रवाह सुधारतो, ज्याचा वृद्धत्वाशी संबंधित डोळ्यांच्या आजारांवर परिणामकारक प्रभाव असल्याचे दिसून आले आहे.