Health Tips : चणे आणि गुळ खाण्याचे फायदे! आजारांपासून सुटका मिळवण्याचा सोपा उपाय; अनेक आजारांपासून सुटका मिळवा
दररोज सकस आहार घेतल्यास अनेक आजारांचा धोका कमी होतो. काही जण आहाराची विशेष काळजी घेतात. पण, काही लोकांना व्यस्त जीवनशैलीमुळे आहारकडे लक्ष देण्याचा वेळ मिळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपूर्वी एक काळ असा होता जेव्हा भारताच्या अनेक भागांमध्ये गुळ आणि चणे हे बहुसंख्य लोकांचं अन्न असायचं.
गूळ आणि हरभरा यांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. गूळ आणि चणे खाण्याचे फायदे काय आहेत, ते वाचा.
चणे आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, फायबरने समृद्ध असून पचन सुधारण्यास मदत करते. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.
गुळ आणि चणे या दोन्ही पदार्थ पचनक्रियेत मदत करतात.
चण्यामध्ये आढळणारे अमिनो ॲसिड आणि गुळामधील प्रीबायोटिक्स देखील पचन सुधारत आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
चणे आणि गूळ खाल्याने पचना संबंधित समस्या दूर होतात आणि पाचन क्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारल्याने अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.
गूळ आणि चण्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात. ही खनिजे हाडांसाठी खूप लाभदायी आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.