Raw Onion Health Benefits : कच्च्या कांद्याचे हे फायदे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या कोणते आहेत हे फायदे
कांदा केवळ जखमांवर उपचार करत नाही तर,आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. कांद्याचा रस आणि कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहुतेक घरांमध्ये कांद्याचा वापर स्वयंपाकात केला जातो, एवढेच नाही तर लोक कच्च्या कांद्याची कोशिंबीरही जेवणासोबत खातात. (Photo Credit : Pixabay)
सोडियम, फोलेट, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक कांद्यामध्ये आढळतात. असे म्हटले जाते की, हे सर्व मिळून कांदा एक सुपरफूड बनतो.(Photo Credit : Pixabay)
कच्च्या कांद्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अनेक पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Pixabay)
कच्चा कांदा हा शरीराला अनेक रोग आणि संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करतो. (Photo Credit : Pixabay)
कच्चा कांदा खाल्ल्याने दृष्टी सुधारते कारण त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई आढळतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. (Photo Credit : Pixabay)
तसेच कच्च्या कंद्यातील हे घटक डोळ्यांची कमजोरी दूर करतात आणि त्यांना मजबूत ठेवण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
कच्चा कांदा मुरुम आणि त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. यामध्ये सल्फर कंपाऊंड आढळून येते जे मुरुमे सुकवण्यास मदत करते. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम राहते. (Photo Credit : Pixabay)
कच्च्या कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. तसेच मुरुम, डाग आणि सूज कमी करण्यासाठी कच्चा कांदा उपयुक्त ठरतो. (Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)