Monsoon Tips: पावसाळ्यात एसी वापरताना सावधान! पावसाळ्यात एसी कितीवर ठेवावा? जाणून घ्या
या ऋतूत कधी पावसामुळे आद्रता, तर कधी उन्हामुळे चिकट उष्णता असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक एअर कंडिशनर म्हणजेच एसी वापरतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या काळात कधी पाऊस पडतो, तर कधी ऊन पडतं आणि त्यामुळे उष्णता जाणवते. या दमट उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक एसी वापरतात.
काहींना पावसाळ्यातही एसी कमी तापमानात चालवण्याची सवय असते. पण यामुळे तुमच्या त्वचेचं किती नुकसान होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
नेहमी एसीमध्ये राहिल्याने त्वचेचा मऊपणा नष्ट होऊ शकतो. त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते. याशिवाय तुम्हाला सर्दी-खोकल्याच्या समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं.
त्यामुळे पाऊस पडल्यानंतरही आर्द्रता कायम राहिल्यास एसी ड्राय मोडवर ठेवावा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात एसी नेहमी 24-26 डिग्री सेल्सिअस तापमानावर ठेवावा. कारण जर तुम्ही कमी तापमानावर एसी ठेवला तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.