Share Market Closing Bell: सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळण; गुंतवणूकदारांची दिवाळी; शेअर बाजारात आज काय घडलं?
भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी सर्वकालिक उच्चांक गाठला.
बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने 65000 अंकांचा टप्पा पहिल्यांदाच गाठला.
आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 486 अंकांच्या तेजीसह 65,205 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 15 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 134 अंकांच्या तेजीसह 19,322 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 24 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले.
बँक निफ्टी निर्देशांकानेदेखील 45000 अंकांचा टप्पा गाठला. बँक निफ्टी 45,158 अंकांवर बंद झाला.
आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल 298.21 लाख कोटी रुपयांवर गेले.
ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टरमधील शेअर्स घसरणीसह बंद झाले.
शेअर बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) वाढ झाली. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.76 लाख कोटींची उसळण दिसून आली.