Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pregnancy Health : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका असतो
या काळात महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्यामध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा वेळी महिला शारीरिकदृष्ट्या अशक्त होतात. त्यांच्यात अशक्तपणाची कमतरता सतत जाणवत असते. आणि त्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील तितकाच वाढतो (Photo credit: Unsplash)
यामुळेच महिलांना गरोदरपणात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आई आणि बाळ दोघांचंही आरोग्य चांगलं राहील. (Photo credit: Unsplash)
गरोदरपणात महिलांना कोणत्या आजारांचा सर्वात जास्त धोका असतो या सदंर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)
गर्भवती महिलांना मधुमेहाचा धोका खूप जास्त असतो. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला गर्भावस्थेतील मधुमेह म्हणतात. (Photo credit: Unsplash)
उच्च रक्तातील साखरेची पातळी गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांसाठीही घातक ठरू शकते. हे टाळण्यासाठी, नियमित तपासणी करा (Photo credit: Unsplash)
गर्भधारणेदरम्यान रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता किंवा अशक्तपणा यांसारख्या सामान्य समस्या अनेक महिलांना जाणवतात. (Photo credit: Unsplash)
गर्भवती महिलांना थायरॉईडचा धोकाही खूप जास्त असतो. गर्भधारणेदरम्यान थायरॉईड ग्रंथी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी असंतुलित होते(Photo credit: Unsplash)
गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाशी संबंधित समस्या वाढू शकतात. गर्भवती महिलांमध्ये गर्भाशयाचे संक्रमण सामान्य आहे. अशा वेळी गर्भवती महिलांनी आपल्या अंतर्गत भागाची काळजी घ्यावी (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)