Rakul Preet- Jackky Bhagnani : रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी कुटुंबासह एअरपोर्टवर स्पॉट!
सध्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. बॉलीवूड कपल रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. (Photo Credit : manav manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo Credit : manav manglani)
दोन्ही स्टार्स आपल्या कुटुंबासोबत एअरपोर्टवर स्पॉट झाले. (Photo Credit : manav manglani)
रकुल केशरी रंगाच्या कॉर्ड-सेटमध्ये दिसली, तर जॅकी भगनानी प्रिंटेड शर्ट आणि काळी पँट घातलेला फंकी लूकमध्ये दिसला. (Photo Credit : manav manglani)
रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 21 फेब्रुवारी 2024 रोजी गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo Credit : manav manglani)
तरुण तहलानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पिकॉर, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता यांनी डिझाईन केलेला आऊटफिट रकुल लग्नात परिधान करणार आहे. (Photo Credit : manav manglani)
लग्नाआधी रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी सिद्धिविनायक मंदिर बाप्पाचं दर्शन घेतलं. (Photo Credit : manav manglani)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. (Photo Credit : manav manglani)
दोघेही एकत्र असल्याची त्यांनी सोशल मीडियावरुन अधिकृत घोषणा केली होती. (Photo Credit : manav manglani)
रकुल आणि जॅकी अनेक पार्ट्यांमध्ये आणि इव्हेंट्समध्ये एकत्रित पाहायला मिळाले आहेत. (Photo Credit : manav manglani)