Side effects of Green Peas : हिरव्या वाटाण्याचे फायदे माहीत असतीलच मात्र तोटे देखील जाणून घ्या !
हिवाळ्याला हिरव्या भाज्यांचा हंगाम देखील म्हणतात. या हंगामात बाजारात भरपूर हिरवे वाटाणे उपलब्ध असतात. हिरव्या वाटाणामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरवे वाटाणे फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे ए, ई, डी, सी, के आणि कोलीन, पॅन्टोथेनिक ऍसिड, रिबोफ्लेविन यांनी समृद्ध असतात. [Photo Credit : Pexel.com]
सर्व भाज्यांमध्ये या भाजीला विशेष स्थान आहे. त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण खूप जास्त असते.अशा परिस्थितीत जास्त वाटाणे खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
मटार खाणे शरीरासाठी हानिकारक ? वाटाणे सोलल्यानंतर त्याच्या चवीमध्ये आणि पोषकतत्त्वांमध्ये अनेक बदल होतात. डॉक्टर अनेकदा ताजे वाटाणे खाण्याची शिफारस करतात. मात्र जास्त वाटाणे खाल्ल्यास शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. [Photo Credit : Pexel.com]
शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्यास रक्त पातळ होऊ लागते. उलट प्लेटलेट्सही कमी होऊ लागतात. ज्यांचे पोट संवेदनशील आहे त्यांनी कधीही वाटाणे खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
पोटात अल्सर, रक्ताच्या गुठळ्या, थ्रोम्बोफ्लिबिटिस यासारख्या आजारांमध्ये वाटाणे खाणे शरीरासाठी हानिकारक असू शकते.[Photo Credit : Pexel.com]
खूप जास्त हिरवे वाटाणे खाल्ल्याने आतडी सिंड्रोम आणि डायरिया सारख्या समस्या उद्भवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
फ्रीजमध्ये ठेवलेले मटार खाऊ नये, ते आरोग्यासाठी चांगले नाही. हिरव्या वाटाणामध्ये कर्बोदकांची समस्या जास्त असते. ते सहजासहजी पचत नाही.[Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे पोटात गॅस तयार होतो.जास्त वाटाणे खाल्ल्याने पोट फुगणे, सूज येणे आणि गॅसची समस्या निर्माण होते. वाटाणे व्यवस्थित शिजवून खावेत.अन्यथा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
जास्त वाटाणे खाल्ल्याने सांधेदुखी आणि युरिक ऍसिडची समस्या वाढू शकते. वाटाणे फक्त मर्यादेपर्यंतच खावेत किंवा हिरव्या भाज्यांमध्ये मिसळून ते तयार करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]