Watermelon Benefits : वजन कमी करण्यासाठी असे मदत करते टरबूज!
पण नेहमी रात्री टरबूज खाणे टाळा, कारण त्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात टरबूज खाल्ल्याने कोणते फायदे होतात.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात टरबूज खाण्याचे फायदे : रोगप्रतिकारक शक्ती : टरबूजमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती, पेशींची रचना आणि शरीरातील कोलेजन तयार होण्यास मदत होते.[Photo Credit : Pexel.com]
टरबूजमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते, जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.[Photo Credit : Pexel.com]
वजन कमी करणे : काही लोकांना असे वाटते की टरबूज गोड असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकते. तथापि, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की 100 ग्रॅम कच्च्या टरबूजमध्ये फक्त 6.2 ग्रॅम साखर असते.[Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे वजन वाढण्याची चिंता न करता तुम्ही ते खाऊ शकता. टरबूजमध्ये जास्त प्रमाणात पाणी तसेच फायबर असते, त्यामुळे जेवणादरम्यान भूक लागत नाही. त्यात कॅलरीज कमी आहेत त्यामुळे तुम्हाला वजन वाढण्याची चिंता करण्याची गरज नाही.[Photo Credit : Pexel.com]
हृदयाचे आरोग्य सुधारते: टरबूजमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : Pexel.com]
काही अभ्यासात असे आढळून आले आहे की टरबूजमध्ये असलेले 'लाइकोपीन' कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब राखण्यास मदत करते. ते उच्च कोलेस्टेरॉलमुळे होणारे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. [Photo Credit : Pexel.com][Photo Credit : Pexel.com]
याशिवाय टरबूजमध्ये असलेले 'सिट्युलिन' हे अमिनो ॲसिड नायट्रिक ऑक्साइड तयार करते ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो.[Photo Credit : Pexel.com]
डोळ्यांसाठी चांगले: टरबूजमध्ये असलेले 'लाइकोपीन' तुमच्या दृष्टीसाठीही खूप फायदेशीर आहे. लाइकोपीनचे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म वय-संबंधित मॅक्युलर ऱ्हास टाळण्यास मदत करू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]